जालना : – महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस भारतीय जनता पार्टी, जालनाच्या वतीने जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भास्कर आबा दानवे म्हणाले की, भारतातील असमानतेच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. सर्वांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा त्यांच्या साहित्य, कार्य आणि संविधानरुपात संपूर्ण देश जपतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही जगण्याच्या एक नवा दृष्टिकोन व दिशा देतात. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.