जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात गजानन तौर यांच्यावर गोळ्या झाडुन हत्या करणार्या आरोपी पैकी दोन संशयीत आरोपींच्या मौजपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्यात. रामनगर कडून जालना शहराकडे येणारे गजानन तौर यांच्यावर मंठा चौफुली परिसरातील होंडा शोरुम समोर अज्ञात गुन्हेगारांने गोळ्या झाडल्या. त्यामध्ये दोन गोळ्या गजानन तौर यांना लागल्या तर दोन गोळ्या चोटून गेल्याचं स्थानिकांनी सांगीतलं.
या घटनेत नांदेड येथील एक शार्पशुटर असल्याचं सांण्यात येतंय. गजानन तौर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर संशयीत आरोपी फरार झाले. पंरतु, जालना शहराकडून मंठा रोडने जात असतांना रामनगर येथे नाकाबंदी असल्याने त्यांनी यु टर्न घेतला. त्यामुळे पोलीस कर्मचारी बाजड यांनी गाडी साईटने घेण्यास सांगीतले. परंतु त्यांनी गाडीची स्पीड वाढविली. त्यामुळे पोलीसांना संशय आला आणि पोलीसांनी त्याचा पाठलाग केला. संशयीत आरोपींनी त्यांची गाडी जालन्याच्या दिशेने वळविली आणि मधल्या मार्गे पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु, कारखाण्याजवळ आल्यानंतर त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडावर धडकली, त्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली गेली. त्यावर मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पीएसआय राकेश नेटके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतलं. सध्या दोन्ही संशयीत आरोपी हे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून एक संशयीत आरोपी मात्र फरार झाल्याचं सांण्यात आलंय.