शहागड येथील शेख कुटुंब हे मोलमजुरी करून उदरनिवार्ह करणारे आहे. त्यांच्या परिवारात नाय्युम शेख हे कर्ते पुरुष होते. या संकटात शेख परिवाराला धीर देण्यासाठी सतीश घाटगे यांनी शेख परीवारीला भेट देऊन सांत्वन केले होते. यावेळी सतीश घाटगे यांना शेख परिवाराच्या आर्थिक स्थितीचा अंदाज आला. म्हणून त्यांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांना आर्थिक मदत केली. सोमवारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी नाना मोरे यांच्या हस्ते शेख कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी इक्बाल बागवान, नजीर शहां, शोएब सय्यद, इम्रान पठाण, रफिक शहा, अन्सार शहा आदि उपस्थित होते.