जालना – शहरातील पाणीवेश काद्राबाद भागातून सदर बाजार डी बी पथकाने 2 धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. काद्राबाद परिसरात राहणाऱ्या दिपेश नवमहलकर याच्याकडे अवैध्द शस्त्रे असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना मिळाली होती. त्यावरून सदर बाजार डी बी पथकाने दिपेश नवमहलकर याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये दोन तलवारी व घरासमोर दोन संशईत स्कूटी विना नंबरची व एक संशईत यामाह कंपनीची आर वन फाईव्ह मोटार सायकल बिना नंबरची मिळून आली.
पोलिसांनी संशयितास सदर स्कुटी व मोटार सायकलच्या कागदपत्राबाबत व त्याचे आर सी बुक बाबत विचारपुस केली असता त्यांने उद्या देतो आज माझ्याकडे नाही असे म्हणत उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दोन तलवारी, दोन संशईत स्कुटी व एक संशईत यामाह कंपनीची आर वन फाईव्ह मोटार सायकल पोलोस ठाणेस आणून जमा केलीय. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोद करण्यात आला असून असा सर्व मिळुन 4 लाख 12000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या गुन्हयाचा पुढील तपास पोहेको कावळे हे करीत आहे.
सदरची कामगोरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक नोपानी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी सचीन सांगळे साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोउपनि भगवान नरोडे, पोहेको जगन्नाथ जाधव, पोहेको सुभाष पवार, पोकों नसीम पठाण, पोकी भरत ढाकणे यांनी पार पाडली.