डोंबिवलीत रस्त्यावर कारमध्ये मोठ्या आवाजात टेप लावून डान्स करत धिंगाणा घालणाऱ्याना टिळक नगर पोलिसांनी थांबविले ,समज दिली . मात्र संतापलेल्या तरुणांनी थेट टिळक नगर पोलीस ठाणे गाठले . कारटेप बंद का केला ,कुणी तक्रार केली ,आम्हाला नाव सांगा , याचा जाब विचारत पोलीस ठाण्यातच कपडे काढून धिंगाणा घातला . सुरुवातीला या तरुणांची समजूत काढणाऱ्या पोलिसांनी अखेर पोलीस खाक्या दाखवत या तरुणांना अटक केली.
डोंबिवली टिळनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर कार लावून काही तरुण डान्स करत धिंगाणा घालत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याठिकाणी बीट मार्शल पोहचले. त्यांनी कारमधील मोठ्या आवाजातील टेप बंद केला. या तरुणांना समज देत पोलीस तिथून निघून गेले . घडलेल्या या प्रकारामुळे संतापलेल्या तरुणांनी थेट पोलीस ठाणे गाठले. आमचा कार टेप का बंद केला तक्रार कोणी केली त्याचं नाव सांगा असं विचारत पोलीस ठाण्यात धिंगाणा घालण्यात सुरुवात केली. अंगावरील कपडे काढून ते महिला पोलिसासमोरच धिंगाणा घालू लागले. या तरुणांना आवारताना पोलिसांच्या नाकी नऊ आले.