- समाजांमध्ये झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात निरपराध नागरिकांची नावे गोवण्यात आली आहेत. हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे. याची शहानिशा करावी, अशी मागणी कुंभारीच्या ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे केली आहे.
बुधवारी रात्री कुंभारी येथे झालेल्या – किरकोळ भांडणानंतर दोन जमावांमध्ये मारहाण झाली. गाड्यांची मोडतोड, घरांच्या काचा फोडल्या. महिलांचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची फिर्याद – वळसंग पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी समझोता करण्याचे प्रयत्न फसले. आमदार विजयकुमार देशमुख – यांच्या नेतृत्वाखाली ८०० ते १००० युवक, महिला भगिनी पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. खोटे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. या प्रकरणाची वस्तूस्थिती वेगळी असुन याची सखोल चौकशी करावी आणि निरपराध लोकांची नावे वगळावीत, अशी विनंती करण्यात आली यावेळी आमदार विजय देशमुख, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, भाजपाचे शिरीष पाटील, यशवंत कटारे, सोमनाथ होनराव, इरेश कटारे, गजानन होनराव,बिपिन करजोळे आदी उपस्थित होते.