- जालना जिल्ह्यातील समृध्दी टी पॉइंटवर चाकूचा धाक दाखवून कार पळवून नेणार्या 3 आरोपींना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथून अटक केल्याची माहिती आज रविवार दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास देण्यात आलीय. अहमदनगर जिल्हयातील अट्टल गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सिनेस्टाईल पाठलाग करावा लागलाय.
जालना जिल्हयात गुन्हेगारावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज दि. 4 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकूचा धाक दाखवून कार हिस्कावुन नेणार्या टोळीचा सुगावा लावलाय. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी नेवासा जि. अहमदनगर येथे जावुन मुकर्कीदपुर शेतवस्ती येथे शेख फिरोज शेख अजीज, रा. लक्ष्मीनगर, नेवासा फाटा, जि. अहमदनगर याच्या घराचा शोध घेतला. त्यावेळी पोलीसांना पाहुन त्याने शेतात धुम ठोकली. त्यामुळे पोलीसांना उसाच्या शेतामध्ये जवळपास दीड ते दोन किलोमीटर पाठलाग करावा लागला. पोलीसांच्या अथक परिश्रमानंतर त्याला ताब्यात घेतलं असून त्याने त्याच्या घरासमोर उभा असलेली कार ही जालना जिल्ह्यातील समृध्दी टी पॉईंट समोर 3 जनाच्या मदतीने चाकूचा धाक दाखवू पळवून आल्याची कबूली दिली. त्यामुळे पोलीसांनी त्याच्या साथीदाराचा शोध नेवासा येथे घेतला असता सुदाम विक्रम जाधव, रा. सुलतानपुर ता. नेवासा जि. अहमदनगर आणि अमर चिलु कांबळे रा. नेवासाफाटा, मुकर्कीदपुर ता. नेवासा जि. अहमदनगर यांना ताब्यात घेलं असून त्यांनी चोरी केलेली स्विफ्ट डिझायर कार देखील पोलीसांनी जप्त केलीय. सदरील आरोपींचा पोलीसांनी रेकॉर्ड तपासला असता त्यांच्यावर जालना, अहमदनगर, पुणे, नाशिक येथे यापुर्वी महिलांच्या मंगळसुत्र चोरी तसेच इतर गंभीर व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक शांतीलाल चव्हाण, राजेंद्र वाघ, पोलीस अमंलदार सॅम्युअल कांबळे, विनायक कोकणे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, योगशे सहाने, देविदास भोजने, सतिश श्रीवास, सचिन आर्य, कैलास चेके, धिरज भोसले, रवि जाधव, सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केलील.