जालना – युवकांमधील क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नमो चषक क्रीडा महोत्सवास रविवारी घनसावंगी मतदारसंघात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या हस्ते रांजणी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे तर समृद्धी साखर कारखान्याच्या मैदानावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नमो चषक व्हॉलीबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.
या उद्घाटन सोहळयास भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजीराव कंटुले, माजी सभापती नामदेव ढाकणे, प्रकाश टकले, परीक्षित शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश खरात, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष गजानन ढेरे, सुदर्शन राऊत, श्रीमंत बाप्पा पोकळे, प्रभाकर देशमुख, विधानसभा संयोजक पुरुषोत्तम उढाण, दत्तात्रय टापरे, मधुकर देशमुख, संजय जाधव रामेश्वर जाधव, उद्धव काकडे, अंकुश तांगडे, किरण भुतेकर, विजय वरखडे, सुनिल पोकळे, उद्धव यादव, प्रभाकर धांडे, लक्ष्मण काटे, वैभव काळे, भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या पुढाकारातून दोन्ही ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्या संघाना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील युवा खेळाडूच्या कौशल्य गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना राज्य आणि देश स्तरावर त्यांचे कौशल्य दाखवता यावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जालना व घनसावंगी तालुक्यातील क्रिकेट संघाच्या स्पर्धा होत आहे. स्पर्धेचे संयोजक पुरुषोत्तम उढाण, विठ्ठल देशमुख व राजकुमार उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहे. या स्पर्धेतून विजयी होणाऱ्या संघाची विधानसभा स्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार. ही स्पर्धा समृद्धी साखर कारखान्यावर होणार आहे.