जालना – शहरातील कन्हैयानगर भागातील विज वितरण विभागाच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता याच्यासह इतर 2 जनावर छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने कारवाई केली असून त्यांना 50 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आलंय. ही कारवाई आज सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आलीय.
यावेळी कनिष्ठ अभियंता गणेशसिंग बबनसिंग बायस,कंत्राटी हेल्पर विष्णू धोंडिबा दांडगे, आणि कंत्राटी लाईन हेल्पर भूषण अशोक वैलकर यांच्यावर 50 हजार रुपयाची लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.