जालना – शहरातील मंगळबाजार भागात आज सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारस गोवंश मांस विक्री करणार्या 3 जनावर छापा मारुन तब्बल 250 किलो गोमांस जप्त करण्यात आलंय. सदरबाजार पोलीस ठाणे अंतर्गत काद्राबाद पोलीस चौकीचे पोलीस उप निरीक्षक शैलेश म्हस्के यांनी ही कारवाई केलीय.
यावेळी ख्वाजा नजीर कुरेशी, फैसल गफार कुरेशी आणि मसूद बशीर कुरेशी या गोमांस विक्रेत्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. यावेळी अवैधरित्या गोमांस विक्री करणार्यावर छापेमारी करुन 50 हजार रुपये किंमतीचे 250 किलो गोमांस जप्त करण्यात आलंय. ही कारवाई पोलीस अधिक्षक अजय कुमार बसंल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, पोलीस उपअधिक्षक अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली काद्राबाद पोलीस चौकीचे पोलीस उपनिरिक्षक शैलेश म्हस्के, पो हे कॉ. डीघोळे, पो. हे. कॉ.सक्रुद्दीन तडवी यांनी केलीय.