कुंभारी :- मंद्रुपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांची बदली झाल्यानंतर नांदेडचे सुजित नरहरे यांची मंद्रुप तहसीलदारपदी निवड करण्यात आली. सुजित नरहरे यांची नांदेड जिल्हयातील मुदखेड तहसील कार्यालयावरून बदली झाली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर नरहरे म्हणाले, मंद्रुप अप्पर तहसील परीसरात जलसिंचित क्षेत्राचे प्रमाण अधिक आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या रस्त्यासह अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबरोबर नागरीकांना विविध दाखले
त्वरित मिळावे म्हणून नागरीकांच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले. सुजित नरहरे हे लातूर जिल्हयातील बाभूळगावचे आहेत. त्यांची नांदेड जिल्हयातील मुदखेड तहसीलदार पदावरून मंद्रुपच्या तहसीलदारपदी बदली झाली. यापूर्वी त्यांनी नांदेड अर्धापूर, बीड, उस्मानाबाद, तुळजापूर येथे तहसीलदार म्हणून काम केले आहे..