राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आशा सेविकांच्या आंदोलनावरुन सरकारला धारेवर धरले. सरकारला आशा सेविकांची कदर नाही, आशा सेविकांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईतील आझाद मैदानावर आशा सेविकांचे वेतनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यासांठी आंदोलन सुरू आहे. कुपोषित बालकांची सेवा करणाऱ्या आशा सेविकांची सरकारला कदर नाही, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
त्याचबरोबर सरकारने राज्यातील आशा सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात. त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली. वाढीव वेतनासह अन्य मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची आशा सेविकांची भूमीका आहे. या आशा सेविकांना सरकारने न्याय दिला पाहिजे. अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे उत्तर विजय वडेट्टीवार यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बरोबर अनेकदा चर्चा केली आहे. सरकार सकारात्मक आहे. पण ते सांगतीलं तसं कसं होईल, आर्थिक परिस्थिती पाहायला लागते. आम्ही त्यांच्याशी पुन्हा चर्चा करु.. असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.