कुंभारी :-जागतिक महिला दिन म्हणजे महिलांना त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देणारा दिवस असून दैनंदिन दिनचर्येतून महिलांनी आता आत्मसन्मानाची जाणीव न विसरता स्वंयसिद्ध होत समाजापुढे आपले कर्तृत्व सिद्ध करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शितल सिताराम म्हेत्रे यांनी कर्देहल्ली येथे जागतिक महिला दिनाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अंगद पवार, जीवन ज्योती ग्राम संघाचे अध्यक्ष सुनिता पवार, सत्यभामा साळुंखे, मानव संसाधन व्यक्ती श्रीदेवी शिंदे, रेखा सोनटक्के, जयश्री पौळ,कृषिसाहाय्य्क वैजंता मोरे त्यांच्यासह गावातील बहुतांशी महिला उपस्थित होत्या.
भारतातील महिलांनी आपल्या कर्तत्वाचा ठसा विविध क्षेत्रात उमटवला! गगनभरी घेणाऱ्या महिला असो किंवा बैंकिंग क्षेत्रातील कापरिट जगतातील उच्चस्पद महिला, राजकारणात येऊन मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या स्त्रिया असो किंवा प्रशासनातील उच्चपदस्त महिला असो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वावरणाऱ्या पुढारलेल्या सुशिक्षित स्वयंसिद्ध महिलांनी जीवनात सर्व क्षेत्रात आपले कर्तव्य सिद्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संगीत खुर्ची, होम मिनिस्टर चा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच जीवन ज्योती ग्राम संघाला मिळालेल्या शेती अवजारांचे पूजन शितलताई मित्रे यांचे हस्ते करण्यात आला