कुंभारी :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील श्री शंभू महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती. सकाळी पाच वाजता श्री शंभू महादेवाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी हजारो भाविकांनी महादेवाच्या
दर्शनाचा लाभ घेतला. तदनंतर शंभू महादेव पालखींचे गाव प्रदक्षिणा करण्यात आली. दुपारी दोन वाजता पूर्वंत व भाविकांनी अग्नी प्रवेश केला. जमलेल्या भाविकांसाठी गावातील नागरिकांच्यावतीने फराळाचे आयोजन करण्यात आले होते.या महाशिवरात्रीला गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.