जालना जिल्ह्यातील एका भोंदू बाबाकडे जावून कौटुंबीक समस्या सोडविण्यासाठी गेलेलल्या महिलेला धक्कादायक अनुभव आलाय. चक्क अंधश्रध्देच्या नावाखाली तीला भोंदुबाबाने मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली असून या मारहाण करणार्या बाबा विरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने आज शुक्रवार दि. 26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेत दिलीय.
जालना जिल्ह्यातील चांदई एक्को येथील भोंदू बाबा सोमनाथ ढाकणे यांच्याकडे पुणे येथील एक महिला कौटुंबिक समस्यांच्या निराकरणासाठी गेली होती. मात्र या महिलेला या भोंदू बाबांकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. मारहाण झल्यांनातर संबंधित महिलेने हा प्रकार जालना येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळवला. या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर अखेर या प्रकरणात हसनाबाद पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार भोंदू बाबा सोमनाथ महाराज ढाकणे उर्फ गुणवंत बाबा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय अहिरे करीत आहेत. या सदंर्भातील माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आलीय. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विमल आगलावे, मधुकर गायकवाड, ज्ञानेश्वर गीराम, संजय हेरकर, शंकर बोर्डे, माया गायकवाड, अनुराधा हेरकर, पीडित महिलेच्या वकील अॅड. स्वाती बारभाई आदींची उपस्थिती होती.