जालना शहरात स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याच्या घटनात वाढ झालीय, प्रत्येक आठवड्यच्या अंतराने एटीएम फोडण्याच्या घटना समोर आल्यात. बुधवार दि. 5 जून 2024 रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास कचेरी रोडवरील गणपती गल्ली जवळील स्टेट बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार घडला. या एटीएम मध्ये गडबड होत असल्याची माहिती रात्रीगस्तीवर असलेल्या पोलीसांना मिळताच पोलीसांनी एटीएम गाठवलं. पोलीसांच्या गाडीचे सायरण वाजताच एटीएम फोडणार्या चोरट्यांनी धुम ठोकली, पोलीस घटनास्थळी वेळेवर आल्याने एटीएम मधील 15 लाख रुपयाची रक्कम सुरक्षीत आहे. मात्र चोरट्यांनी एटीएम फोडून मोठं नुकसान केलंय.
या प्रकरणाची माहिती पोलीस उप निरीक्षक ज्ञानदेव नांगरे यांनी स्टेट बँकेच्या अधिकार्यांना दिल्यानंतर बँकेच्या अधिकार्यांनी कदीम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन एटीएम फोडणार्या अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्या 3 संशयीतांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.