जालना जिल्ह्यात पाण्याच्या टंचाईचा विचार करता शेतकर्यांना विहीरीची अत्यंत गरज आहे. परंतु, कष्टकरी शेतकर्यांना विहीरी मंजुर न करता त्या धनदांडग्यांना मंजुर करुन दिल्या जातात, त्यामुळे कष्टकरी शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्येसाखा मार्ग निवडतो, जर शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्यांना रोजगार हमी योजनेतून विहीरी मंजुर करुन वर्क ऑर्डर तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी अंकुश काळे यांनी गुरुवार दि. 6 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता गटविकास अधिकारी यांच्याकडे केली.
रोजगार हमीच्या अनुशंगाने गटविकास अधिकारी यांना निवेदन देत, शेतकर्यांची होणारी अडवणूक दुर करण्याची मागणी केली. शिवाय शेतीच्या किंवा गावातील कोणत्याही कामासाठी टेबलनिहाय लागणारे पैसे किंवा टक्केवारी पध्दत बंद करुन शेतकर्यांना मदत करण्याची मागणी देखील अंकुश काळे यांनी केलीय.