महाराष्ट्रातील लोकसभेचे चित्र पाहता आगामी विधानसभेत सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघेही निवडून येणार नाहीत. कारण, ते एकमेकांना स्वतःच पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत तर देवेंद्र फडणविस हे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी शिंदे त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत असे जालना येथील कॉग्रेस सहकार सेलचे उपाध्यक्ष फकीरा वाघ यांनी गुरुवार दि. 6 जून 2024 रोजी दुपारी 2 वाजता म्हटलंय. शिवाय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी युती करावी व मंत्री व्हावं, त्यांना मंत्री म्हणून पाहण्याची सर्वांचीच इच्छा आहे. असंही फकीरा वाघ यांनी म्हटलंय.