दक्षिण सोलापूर तालुक्यातील वीज पडून मयत झालेल्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना शासकीय मदत मिळवून देणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील बिळेनी डक्के (पुजारी) व गुर्देहलळी येथील आमसिद्ध गायकवाड हे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत मरण पावले होते. आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या गावी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनपर भेट घेतले. लवकरच शासनाकडून आर्थिक मदत मिळून देणार असल्याचे सांगितले.