जालना – आई-वडील हे कोणत्याही मुलांचे पहिले गुरु असतात. त्यानंतर शाळेतील शिक्षक हा त्यांचा गुरु असतो. त्यामुळे गुरु पौर्णिमेनिमित्त किंग्स इंग्लिश शाळेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातापित्यांचे पाय धूऊन पुजा केली. हा कार्यक्रम शनिवार दि. 20 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता पार पडला.
माता पित्यांची सेवा आणि मुलांच्या मनात त्यांच्या बद्दल आदरभाव निर्माण करण्यासाठी शाळेने हा अनोखा उपक्रम राबविलाय. त्यामुळे मुलांच्या मनात मातापित्या बद्दल संस्कार रुजविण्याचं हे एक प्रॅक्टिकल म्हणावं लागेल. अशा उपक्रमामुळे मुलांच्या मनात संस्कार रुजण्याबरोबरच माता पित्यांची सेवा आणि गुरुचे महत्व देखील विद्यार्थ्यांना कळेल अशी भावना शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केलीय. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातापित्यांचे पाय धुऊन त्यांची पुजा केली.