घनसावंगी: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मान, सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी भाव देणारा समृद्धी साखर कारखाना गाळप हंगाम 2024- 25 साठी सज्ज झाला आहे. समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिलीप फलके, संचालक विकी शिंदे यांच्या हस्ते सोमवारी रोलर पूजन समारंभ पार पडला.
शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात उच्चांकी भाव देणारा कारखाना म्हणून समृद्धी साखर कारखान्याची ओळख निर्माण झाली आहे. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये समृद्धी कारखान्यात गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी पेक्षा ११० रुपये अधिक भाव देत २ हजार ८०० रुपये प्रतीटन प्रमाणे अंतिम बिल दिले. तर गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये समृद्धी साखर कारखान्यात गाळप होणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी पहिली उचल (हप्ता ) २८०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे देऊन उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवली. समृद्धी साखर कारखान्याकडून उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आणि आनंदी आहेत.
सोमवारी पार पडलेल्या रोलर पूजन समारंभास प्लॅन्ट हेड फॅक्ट्री मॅनेजर आर. एस. माथणकर, चीफ इंजिनियर एस. टी. सुरवसे , चीफ केमिस्ट माथुर, सिव्हिल इंजिनिअर पवार , एचआर मॅनेजर खरात, गोडाऊन कीपर पंडित, लॅब इन्चार्ज कुलवाल साहेब यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या उसाला यंदाही उच्चांकीचं भाव
दरम्यान गाळप हंगाम २०२४ -२५ साठी समृद्धी साखर कारखाना सज्ज झाला असून कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रोलर पूजन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी गाळप हंगामाच्या तयारीचा चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी आढावा घेतला. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उसाचे योग्य नियोजन करून कमी वेळेत अधिक उस गाळपाचे उदिष्ट कारखाना पूर्ण करण्याचे नियोजन असून या हंगामात देखील शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकीचं भाव देण्याचा प्रयत्न समृद्धी कारखाना करणार असल्याचे सतीश घाटगे व महेंद्र मेठी यांनी सांगितले.