मुंबई : सरकारच्या लाडक्या बहिण योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात देखील महिला सगळं घर चालवतात. 1500 देऊन अपमान का करता त्यांना 10 हजार रुपये द्या, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणतात, सध्याच्या सरकारचे जे काही सुरू आहे त्याला अर्थिक बेशिस्त म्हणतात. देश किंवा राज्य चालवतान आर्थिक शिस्त म्हत्त्वाची आहे. निवडणुका जिंकण्यासाठी तुमच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि तुम्ही मोठमोठ्या योजनांच्या घोषणा करत सुटले आहे. त्याला आर्थिक शिस्त म्हणत नाही. योजनांसाठी कुठून पैसे आणणार याचे काही प्लानिंग नाही. निवडणुकानंतर या योजना बंद पडणार. कारण सरकार बदलणार हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे.
लाडक्या बहिणींचा अपमान करु नका : संजय राऊत
सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेंतर्गत त्यांना 1500 रुपये मिळतात. महागाईच्या काळात सगळं घर महिला चालवतात, त्यांना 1500 नाही तर 10 हजार रुपये द्या. महागाई, सिलेंडरचे वाढलेलले दर पाहता त्यांना जास्त पैशांची गरज आहे. पदवीधरांना आठ हजार, 12 वी पास असणाऱ्यांना सहा हजार आणि लाडक्या बहिणीला 1500 हा अपमान कशाला करता? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
आमदार अपात्रता प्रकरणती शिंदे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ते निवडणुकीत हरणार आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवले आहे. आता दोन महिन्यांसाठी धावाधाव करुन काय मिळवणार आहे. जर सर्वोच्च न्यायलयाने संविधान आणि घटनेचा मान राखला तर 24 तासात सगळे अपात्र ठरतील. त्यांचा पक्ष, चिन्ह हे गोठवले जाईल, असे संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत. लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि आता एका महिन्यात त्यांची भुमिका बदलली आहे. काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भुमिका घेण्यासाठी बनले आहेत. मुंबई लुटणाऱ्यांना शक्तींना मनसे पाठीबा देत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. विधानसभेच्या अपशकुनाची सुरुवात झाल्याचे देखील राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र असते तर पक्ष टिकला असता असे राज ठाकरे म्हणाले, यावर संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापेक्षा खूप मजबूत आहे. शरद पवारांच्या पक्षाने कधी नव्हे ते इतकं मोठं यश मिळवलं. पक्ष हलला नाही, 8 लोकसभेच्या जागा पवारांच्या नेतृत्त्वात जिंकल्या. हे पक्ष टिकल्याचे लक्षण आहे. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेऊन सुद्धा आम्ही ताकदीने लढलो, 9 जागा जिंकल्या. खरे पक्ष कोणते हे लोकांना माहिती आहेत.