जालना तालुक्यातील निराधारांसाठी तहसिल कार्यालयाकडून एक खुशखबर देण्यात आलीय. निराधार योजनेच्या सुमारे 19 हजार 626 लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे पैसे जमा होणार असल्याची माहिती शुक्रवार दि. 26 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता तहसिलदार छाया पवार यांनी दिलीय.
जालना शहर व तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थीना डीबीटीमार्फत त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांना त्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर लिंक करावा लागणार आहे. यासाठी बँक खात्याशी आधार लिंक करण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. तसेच संजय गांधी शहर विभागात समक्ष लाभार्थ्यांकडुन जमा करुन घेण्यांत येत आहेत. निराधार व्यक्तींना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठरावीक मानधन दिले जाते. यासाठी तहसीलदार यांच्यामार्फत यादी पाठवून त्यानुसार निधीचे वाटप केले जात होते. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थीच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थीना अनुदानासाठी बँकांत खेटे घालावे लागत होते. मात्र, यापूढे डीबीटीमार्फत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जालना शहरातील संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचे मिळून 19 हजार 626 लाभार्थी संख्या आहे. या सर्व निराधारांची हेळसांड कायमची थांबविण्यासाठी दोन्ही योजनांचा लाभ घेणार्या पात्र लाभार्थ्यांकडून बँक खात्याला आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक संलग्न करुन घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. असेही तहसलिदार छाया पवार यांनी सांगीतलंय.