जालना शहरातील खरपुडी रोडवर असलेल्या चाळगे मेगा सिटी येथे एका तरुणाचा खून झालाचा प्रकार मंगळवार दि. 30 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेष उनवने यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतलीय.
गेल्या काही दिवसापासून जालना शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यानचा परिसर अत्यंत संवेदनशील बनलाय. खूनाच्या घटना याच भागात होत असल्याने नागरीकात भितीचं वातावरण निर्माण झालंय. आज पुन्हा खरपुडी रोडवरील चाळगे मेगा सिटी येथे भिम राठोड वय 30 वर्ष या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात येत आहे. सदरील मयत तरुण हा परप्रांतीय असल्याचं सांगण्यात आलंय. या तरुणाचा खून हा गळा आवळून झाल्याचं सांगण्यात आलंय. घटनास्थळावर दारुच्या बाटल्या आणि ग्लास आढळून आलेत. पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.