पालघर प्रतिनिधी – दशरथ दळवी
अहमदाबाद वरून मुंबई व मुंबई वरून अहमदाबाद जाणारा हायवे नं 48 हा महामार्ग धोकादायक व त्रासदायक ठरत आहे. यंदा म्हणजे २०२४ पावसाळ्याला २ महिने असताना हा महामार्ग कॉक्रीटीकरण सिमेंट चा हायवे बनवायला सुरुवात केला होता, परंतु घोडबंदर ते आच्छाड पर्यंत महामार्ग पूर्ण झाला नाही. आणि ठिक -ठिकाणी रस्ता अपूर्ण असल्याने मोठ – मोठे खड्डे पावसाळ्यात पडले आहेत. वाहतूक कोंडी होत आहे.
वाहन चालक व मालक या मार्गावर चालवायला कंटाळत आहे. वाहनांच्या रांगा ५-६ किलोमीटर असतात तसेच दररोज अपघात होत आहेत. परंतु रस्ते प्राधिकरण व महाराष्ट्र सरकार झोपेत आहे. असे ही वाहन चालक व मालकांचे म्हणणे आहे. अहमदाबाद मुंबई महामार्ग हा सध्या धोकादायक व त्रासदायक ठरत आहे.