जालना तालुक्यातील हिवरा रोषणगाव येथील गणेश पाडमुख या शेतकर्याचे सोमवार दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री 1.30 ते पहाटे 4 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बैल चोरुन नेल्याची घटना घडली. पहाटे 6 वाजता हा बैल चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकर्याने थेट मौजपुरी पोलीस ठाणे गाठले, परंतु, उपस्थित ठाणे आंमलदार यांनी तक्रार नोंदवून न घेता आम्ही पंचनामा करायला येतो असे सांगून घरी जाण्यास सांगीतले. एका शेतकर्याची बैल चोरीची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणार्या ठाणे अंमलदाराची माहिती शेतकर्याच्या नातेवाईकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांना देण्यात आली.
शेतकरी बैल चोरीमुळे हवालदिल झालेला असतांना दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास कार्यरत असलेले ठाणे आंमलदार यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही, तसेच पंचनाम्यासाठी देखील कुणाला गावात पाठविले नाही. त्यामुळे या प्रकरणाची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांना देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास या बैल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.