जालना :- देशभरात दि. 9 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान “घरोघरी तिरंगा” अभियान राबविले जात आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये घरोघरी तिरंगा अभियानसह, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. या अभियानात जिल्हयातील सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आज काढण्यात आलेल्या तिरंगा सायकल रॅलीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. रॅलीस जालनेकरांचा भरभरुन प्रतिसाद लाभला.
आज सकाळी जालना शहरातील हुतात्मा जनार्धन मामा चौकातून सायकल रॅलीचा शुभारंभ झाला. स्वत: जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त आयुक्त संतोष खांडेकर यांनी सायकल चालवीत या रॅलीमध्ये सहभाग घेतला. रॅलीमध्ये मोठया संख्येने युवक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीच्या वेळी देण्यात येत असलेल्या विविध देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदूमून गेले होते. मामा चौक, सुभाष चौक, मंमादेवी चौक, गांधी चमन चौक, रेल्वे स्टेशन रोड, उड्डाणपूल, नूतन वसाहत मार्गे, अंबड चौफुली येथे पोहोचल्यावर रॅलीचा समारोप झाला.
रॅलीत विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, महापालिका उपायुक्त नंदा गायकवाड, सहायक आयुक्त केशव कानपुडे, डॉ. कैलास सचदेव, विजय आगळे, महापालिकेचे राहुल देशमुख, विजय फुलंब्रीकर, स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार, सय्यद सौद, संजय वाघमारे, जगत घुगे, संजय भालेराव, बंडू चव्हाण, अशोक लोंढे, राजेश बगळे, अनिता चंद्रहास, आशा गाडे आदी महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.