जालना – जुनी पेन्शन योजना आणि इतर महत्वाच्या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्या जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने शुक्रवार दि. 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.
आंदोलनादरम्यान जोरदार पाऊस सुरु झाला होता. पंरतु, आंदोलकांनी पडत्या पावसातही न्याय हक्कासाठी आंदोलन सुरुच ठेववलं.
सुधारित जुनी पेन्शन योजना लागू करणे व वित्त विभागाचा शासन निर्णय हा झालेल्या बैठकीनुसार लागू करणे, हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलेल्या ठरावा नुसार नियमित आर्थिक लाभाची व सामाजिक सुरक्षेच्या पेन्शनचे अध्यादेश निर्गमित करावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात करण्यात आलं. आरपारची लढाई करण्याचा हा एक टप्पा म्हणून दिनांक 9 ऑगस्ट 2024 क्रांती दिना च्या निमित्ताने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रवीण पवार, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. बी. काळे, जिल्हा सरचिटणीस संजय चव्हाण, कार्याध्यक्ष के. डी. भोजने, पी.एस. वाघ, अभियंता संघटनेचे अभियंता घोरपडे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.