जालना – शहर महानगर पालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियाना अंतर्गत बचत गटाने उत्पादीत केलेल्या सॅनीटरी पॅडला गुजरातमधून आणि मध्यप्रदेशातून मागणी असल्याने सोमवार दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 वाजता 8 हजार सॅनिटरी पॅडचा लॉट पाठविण्यात आलाय.
यावेळी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, कार्यालय अधीक्षक विजय फुलब्रिकर, महीला बालकल्याण विभाग प्रमुख रामेश्वर घोळवे तसेच युनिट मधील महिला आणि कर्मचारी उपस्थित होते. दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादीत कापडी व पुनर्वापर करता येणारे सॅनिटरी पॅड तयार करण्यात येत आहेत. या पॅडला गुजरात आणि मध्यप्रदेश येथून मोठ्या प्रमाणात मागणी असून या मागणी प्रमाणे आज 8000 पॅड ची ऑर्डर डेहराडून व ओडीसा येथे पाठविण्यात आली.