कुंभारी :- दक्षिण सोलापूर तालुक्यात ‘माझी लाडकी बहीन’ योजनेत एकूण ६४०३२ अर्जा पैकी ६१३०५ बहीनी पात्र झाल्या असुन,3 हजार ७२७ बहिणीअशंता अपात्र झाल्या आहेत. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले काळजी घेत असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी अशी सूचना दिलेले आहेत.जे अर्ज अपात्र झाले आहेत अशा अर्जाना परिपूर्ण करून परत दाखल करावेत. इंटरनेट सुविधाअभावी अडचणी येत असल्याने पर्यायी व्यवस्था करत,त्याचबरोबर ग्रामीण भागात लाभार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेताना रेंजच्या येणाऱ्या अडचणीवर मात करून अर्ज दाखल करून घ्यावेत. प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरला जावा,यासाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजनेअंतर्गत दक्षिण तालुक्यातून १० ऑगस्टपर्यंत ६४ हजार 32 लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले छाननीअंती६१ हजार ३0५अर्ज मंजूर करण्यात आले बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले यांनी दिली.