महाराष्ट्र शासनाने जेष्ठ नागरीकांसाठी जाहिर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा योजनेसाठी जेष्ठ नागरीकांनी अर्ज करावेत असे आवाहन जालना येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत कदम यांनी सोमवार दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 वाजता केलंय. जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जावून मन:शांती तसेच अध्यात्मिक पटल गाठणे सुखकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजन अंमलात आणली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी दि.31 ऑक्टोबर 2024 पर्यंत समाज कल्याण कार्यालय, जालना येथे अर्ज सादर करावेत, असेही सहायक आयुक्त अनंत कदम यांनी म्हटलंय.
योजनेत प्रत्यक्ष प्रवास, भोजन आणि निवासी आदी सर्व बाबीच्या प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये शासनाने मंजूर केली आहे. लाभार्थी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असावा. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. वैद्यकिय अधिकार्याने पुर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारिरीकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. असेही अनंत कमद यांनी म्हटलंय.