जालना शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयात सोमवार दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व प्रबोधन अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत वाहतुकीच्या नियमाचे मार्गदर्शन करण्यात आले.
राज्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याच्या उद्देशाने अप्पर पोलीस महासंचालक सुरेश कुमार मेखला व पोलीस अधीक्षक साळवे, पोलीस अधीक्षक श्रीमती दरेकर, पोलीस उप अधीक्षक डीसले, पोलीस निरीक्षक सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक आर. के. निकम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पालकासोबत प्रवास करीत असतांना वाहतुकीच्या नियमाचे पालन कसे करावे यावर मार्गदर्शन केलं. यावेळी शाळेचे गंभीर पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. लायसन असल्याशिवाय वाहन चालवू नये. रोड वलंडतांना आधी उजव्या बाजूला बघावे त्यानंतर डाव्या बाजूला बघावे मंग रोड पार करावा. मोटर सायकलवर दोन सीटचाच वापर करावा. मोटर सायकलवर प्रवास करतांना हेल्मेटचा वापर करावा.
आतील रोड वरून मेन रोडला येतांना थोडे थांबावे, दोन्ही बाजूंना बघावे नंतर वाहन अथवा आपण रोड वर यावे, रस्त्यावर धोकादायक रित्या भरधाव वेगाने वाहन चालू नये, धोकादायक रित्या रस्त्यावर वाहन उभा करू नये, चार चाकी वाहनात प्रवास करतांना सीट बेल्टचा वापर करावा, वाहनास पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर लावून घ्यावेत, महामार्गावर वाहन चालकाने वाहन चालवत असतांना मोठ मोठ्याने गाणी लावून वाहन चालवू नये, गाडीचे कागदपत्रे सोबत बाळगावेत, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये यासह विविध वाहतुक नियमाची माहिती देण्यात आली.