जालना शहरातील सराईत गुन्हेगार गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून चोरीचे 3 तोळ्याचं सोन्याचं गंठण जप्त करण्यात आलंय. ही कारवाई दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी बुधवार दि. 21 ऑगस्ट 2024 रोजी दिलीय.
जालना शहरातील अंबड चौफुली भागात दि. 8 जुन 2024 रोजी एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागीन्यासह रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिग गुन्हे शाखेच्या पथकाने दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी गुप्त माहितीच्या आधारे गांधीनगर येथून गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरील चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक याने चोरी केलेले 3 तोळ्याचे सोन्याचे गंठण देखील काढून दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स.पो.नि. योगेश उबाळे, स.पो.नि. शांतीलाल चव्हाण, पो.उप.नि. राजेंद्र वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सुधीर वाघमारे, संदीप चिंचोले, धीरज भोसले, योगेश सहाने, कैलास चेके, सौरभ मुळे यांनी केलीय.