जालना – कलकत्ता येथील डॉकटर महीला आणि महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील दोन शाळकरी चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आज बुधवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल आणि युवा नेते अक्षय गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण वाचवा, मुख्यमंत्री माझी लाडकी लेक वाचवा, नराधम आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा विविध घोषणा देत सहभागी आंदोलकांनी जालनेकरांचे लक्ष वेधले. यावेळी विजय चौधरी, महावीर ढक्का, बदर चाऊस, सौ.सुष्माताई पायगव्हाणे, दिनकर घेवंदे, अब्दुल रउफ परसुवाले, वाजेद पठाण, शहर महीला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.शितलताई तनपुरे, सेवादल काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अंजली सपकाळ, रमेश गौरक्षक, जगदीश भरतीया, अशोक भगत, संजय भगत, विनोद यादव, राज स्वामी, नजीब लोहार, राधाकिसन दाभाडे, चंद्रशेखर कोताकोंडा, आनंद वाघमारे, शेख शकील, फकिरा वाघ, ईर्शाद शेख, किशोर कदम, शेख शमशोद्दीन, इस्माईल परसूवाले, बालाजी रोडे, रॉबिन कमाने, संजय दाभाडे, संजय पाखरे, धरम सोनवणे, करीम लिडर, शेख अल्ताफ, शेख युसूब, विलास जगधणे, आरेफ सय्यद, योगेश, ढोबळे, सागर पोटपत्रेवार, मंदा पवार, सुषमा खरात, आशाताई जाधव, मोनिका जाधव, दुर्गा कांबळे, वंदना लालझरे, संतोष काबलीये, सीताबाई दाभाडे, प्रिया जाधव, सुजाता पोलास, सोनू सामलेटी, स्वाती गव्हाणे, लवेकर वृषाली, योगेश पाटील,संतोष तूपसौंदर, सागर ढक्का, गोपाल चित्राल, अंकुश येंगदळ, ओंकार घोडे, धावडे, राठोड, पापणवार, धानुरे, चित्राल यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित आंदोलकांनी राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणा देत कलकत्ता आणि बदलापूर येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी युवा नेते अक्षय गोरंटयाल आणि दिनकर घेवंदे यांनी अत्याचारांच्या घटनांचा तीव्र शब्दात निषेध करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आपल्या भाषणातून केली.
आर्थिक पाठबळापेक्षा महिलांना सुरक्षा महत्वाची – सौ. गोरंटयाल
कलकत्ता येथील एका महिला डॉक्टरसह महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना अत्यंत निंदनीय आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्या रोखण्यासाठी कायदा पारित करून शासनाने कडक पाऊल उचलावे आणि या दोन्ही घटनेतील आरोपींना तातडीने कठोर शिक्षा करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांनी यावेळी केली. बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ तेथील स्थानिक नागरिकांनी कित्येक तास केलेले आंदोलन राज्य सरकारने अक्षरशः चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. बळाचा वापर करून जर सरकार आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर जालना शहरातील सर्व जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देत सदर घटना आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सौ. गोरंटयाल म्हणाल्या की, अनेक महिला या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक पाठबळापेक्षा सुरक्षेची आवश्यकता अधिक असून महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने तात्काळ कडक स्वरूपाचा कायदा पारित करावा अशी मागणी देखील सौ. गोरंटयाल यांनी यावेळी केली.