जालना – सिटू सलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बुधवार दि. 21 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वाजता कामगारांच्या विविध प्रलंबीत प्रश्नावर तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी लाल बावटा कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आलं.
यावेळी बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. जालना जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये मिस्त्री, बिगारी, गवंडी, लोहार, सुतार, इलेक्ट्रिशन, वीटभट्टी मजूर, खडी फोडणारे मजूर, पेंटर, वेल्डर आदी कामे करणारे नोंदीत कामगार आहेत. बर्याच कामगाराचे नूतनीकरण संपले असून ग्रामसेवक 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देत नसल्यामुळे कामगारांना लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागतंय. ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. 13 जून 2024 रोजी पत्र काढून ग्रामसेवकांनी संबंधितांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत. भांडी कॅम्प लावण्यात यावेत. या व इतर मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्यात. यावेळी जेष्ठ कामगार नेते कॉ. अण्णा सावंत, सिटू चे जिल्हाध्यक्ष कॉ. मधुकर मोकळे, संघटनेचे जन. सेक्रेटरी अॅड. अनिल मिसाळ, कॉ. मदन एखंडे, कॉ. बाबासाहेब पाटोळे, लक्ष्मण मोहिते, सुनिता म्हस्के, शेषराव काळे, ज्ञानेश्वर मिसाळ, माणिक मिसाळ अनिरुद्ध सराटे, ज्ञानेश्वर सराटे, नकुल भुतेकर, यादवराव दिघे, चंपाबाई दाभाडे, काकासाहेब खैरे, विठ्ठल वखरे, गोरख राठोड, पंचशीला उगले, वंदना दाभाडे, अनिता पवार यांच्यासह कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.