जालना जिल्हा परिषदेत पालकमंत्री अतुल सावे यांनी हस्तक्षेप सुरु केला असून जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामासाठी दिला जाणारा निधी हा टक्केवारी घेऊनच दिला जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंडागळे यांनी केलाय.
शुक्रवार दि. 27 सप्टेंब 2024 रोजी दुपारी 4.30 वाजता त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्यामुळे येणार्या काही दिवसात मारामार्या होतील असा अंदाज देखील वर्तविलाय. पालकमंत्री हे टक्केवारी जास्त देणार्यांनाच निधी आणि कामं देतात, गरज आहे किंवा नाही, काम झालंय किंवा नाही, प्रस्ताव आहे किंवा नाही हे पाहिलं जात नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन करणार असून कमिशनरकडे जाणार असल्याचं सुरेश खंडागळे यांनी म्हटलंय.