मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत पुरुषांचे आधार कार्ड वापरुन अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला असून प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे सदस्य संतोष ढेंगळे यांनी शुक्रवार दि. 27 सप्टेंब 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता दिली.
जालना तालुक्यातील लाडक्या बहिणींचे सुमारे 1 लाख 29 हजार अर्ज आले असून त्या पैकी 1 लाख 27 हजार लाडक्या बहिणीच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली असून आतापर्यत 1 लाख 25 हजार लाडक्या बहिणीला लाभ देण्यात आलाय. यात सुमारे 711 अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. ज्या महिलांना आतापर्यत पैसे मिळाले नाहीत त्यांना 3 महिन्याचे पैसे एकदाच मिळणार असून त्याला सुरुवात देखील झाली. येणार्या 30 तारखेपर्यत मंजुर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील. ज्या महिलांनी आतापर्यत नोंदणी केली नाही त्यांनी जवळच्या अंगणवाडीत जावून अर्ज भरावेत असे आवाहन देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे सदस्य संतोष ढेंगळे यांनी केलंय.