पीएचडी चा अभ्यास करीत सतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या कायद्यात दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अॅड. डॉ. दिपक कोल्हे यांनी रविवार दि. 29 सप्टेंब 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता केलं. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. डॉ. दिपक कोल्हे यांनी अँटी करप्शन लॉ मध्ये विद्यावाचस्पती तथा पी.एच.डी. प्राप्त केली. त्यामुळे त्यांचा देहेडकरवाडी येथे एस. एन. कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांनी सत्कार सोहळा आयोजित केला होत. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
अँटी करप्शन लॉ मध्ये ज्याने रु.100 रु. ची लाच स्वीकारली त्याला ज्या शिक्षेची तरतूद आहे तीच तरतूद करोडो रुपयांची लाच स्विकरणार्याला देखील आहे, या लाचेच्या प्रकरणात जेवढ्या काही केसेस होतात त्यात एक टक्काही केसेस यशस्वी होत नाही हे खरे दुर्दैव आहे. त्यांनी या विषयी जो प्रबंध सादर केला त्याची विस्तृत माहिती दिली. लाच लुचपत विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक रमेशराव देहडकर, जेष्ठ समाजसेविका सौ. रसनाताई देहडकर, अध्यक्ष एस. एन. कुळकर्णी, कल्याणराव देशपांडे, डॉ. सुभाष भाले, श्रीकांत शेलगावकर, रवींद्र देशपांडे, डॉ. संजय रुईखेडकर, कैलाश भाले, डॉ. मनीष पाटील, सुनील लोणकर, शेख नईम, शेख फपू, मुकुंद कुळकर्णी, भगवान पुराणिक, विनायक गरदास, कृष्णा भालेराव, बरसाले, माऊली कोल्हे, सौ. छाया भाले, सौ. मंगल शेलगावकर, श्रीमती प्रभा हंडे आदी उपस्थित होते.