जालना येथील सदरबाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धडक कारवाई करुन 4 बुलेट आणि विविध कंपन्याच्या 8 दुचाकी दुचाकी जप्त केल्या असून 3 आरोपींच्या मुसक्या देखील आवळण्यात आल्यात. सदरील आरोपीच्या ताब्यातून तब्बल 11 लाख 98 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सोमवार दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता पोलीस सुत्रांनी दिली.
मंठा चौफुली भागात एक संशयीत आरोपी हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती डीबी पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक भगवान नरोडे यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी मंठा चौफुली भागात धाव घेतली. दरम्यान त्या ठिकाणी मंगेश गायकवाड हा आला असता पोलीसांनी त्यास ताब्यात घेत विचारपुस केली. दरम्यान त्याने आणलेली दुचाकी ही चोरीची असल्याची कबुली दिली व इतर दुचाकी देखील पोलीसांच्या भितीने लवपून ठेवल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलांनी अधिक तपास करुन दिनेश दत्तात्रय पवार रा. शिषटेकडी जालना, संदेश प्रभाकर पाटोळे रा. नुतन वसाहत जालना हे गाड्या चोरुन गजेंद्र नारायणसिंग सूर्यवंशी रा शिषटेकडी जुना जालना, मंगेश महेंद्र गायकावाड रा भाग्योदय नगर अंबड चौफुली जालना, वैभव सुर्यकांत एखंडे रा-चौधरी नगर जालना यांच्या मदतीने गाड्या त्याची गरीब आणि गरजू शेतकर्यांना कमी किंमतीत व विना कागदपत्राच्या गाड्या विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यामुळे पोलीसांनी मंगेश महेंद्र गायकावाड, गजेंद्र नारायणसिंग सूर्यवंशी, वैभव सुर्यकांत एखंडे यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून 4 बुलेट, 4 एच एफ डिलक्स, 1 स्प्लेन्डर, 2 पल्सर व 1 युनिकॉर्न अशा एकुन 11 लाख 98 हजार 300 रुपये किंमतीच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आल्यात.
सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती, डीबी पथक प्रमुख पोउपनि भगवान नरोडे, पोहेको जगन्नाथ जाधव, पोना नजीर पटेल, पोकॉ. दुर्गेश गोफणे, गणेश तेजनकर, अजिम शेख, हिवाळे, कल्पेश पाटील यांनी केली.