विजया दशमी निमित्त दरवर्षी जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात होणारे रावण दहन या वर्षी देखील करण्यात आले. शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास फटाक्याची आतषबाजी करुन रावण दहन करण्यात आले. यावेळी नयनरम्य फटाक्याच्या आतषबाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. कल्याणराव काळे, आ. कैलास गोरंट्याल, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, राजेश राऊत, भास्कर दानवे, विनीत साहनी, राजेश कामड, शेख महमूद, घनश्याम गोयल, बबलू चौधरी, उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी, अशोक पांगारकर, विष्णू पाचफुले आदींची उपस्थिती होती.