सम्राट अशोक विजयादशमी निमित्त शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड, जालना येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी भंते शिलरत्त्न महाथेरो यांनी धम्म उपासक उपासिकांना प्रवचन दिले. धम्माचे आचरण आणि 22 प्रतिज्ञाचं पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यापेळी केलं. त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा धम्म समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त महापुरुषांचे विचार पेरण्याचा ध्यास घ्यावा असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
महिलांनी आपल्या कुटुंबात लहान मुलांना बालपणापासूनच धम्माचे संस्कार रुजवणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच धम्माचे, संस्काराचे आचरण अवगत करणे गरजेचे आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले. या कार्यक्रमास राजेश सदावर्ते, आशालता शेजवळ, करुणा साळवे, वंदना हिवाळे, संगीता पाजगे, कांता बोर्डे, कविता दहिवले, मालता सदावर्ते, फकीरा वाघ, पांडुरंग हिवाळे, हरीश रत्नपारखे, विकास जाधव, अंबादास खरात, प्रा. कुलदीप गरड, बौधाचार्य शेषराव सोनवणे, भारत खंदारे, पी. एस. गडवे, दिलीप शिंदे, सत्यजित दहिवले, मिलिंद धनेधर, प्रमोद खरात, समता सैनिक दल यांच्यासह धम्म बांधवांची उपस्थिती होती.