जालना शहरातील चंदनझीरा भागातील एका चिमुकलीवर अत्याचार करुन तीला फेकूण देणार्या नराधमाला भर चौकात फाशी द्या, त्याचे एन्कांऊटर करा, त्याचे लिंग कापून त्याचे हात, पाय तोडा अशी मागणी करीत अत्यंत कडक शब्दात संतापलेल्या जालनेकरांनी रोष व्यक्त केलाय. या संदर्भात सोमवार दि. 14 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देखील देण्यात आलंय.
चंदनझीरा भागात एका चिमुकलीवर बालात्कार करणार्या नराधमांना कोणतीही दयामया न दाखवीता त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच पोलीसांना मोकळ्या पध्दतीने काम करण्याची मुभा द्यावी, त्यांच्यावर कोणताही दबाव न टाकता कारवाई कराव अशी मागणी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रमेश देहेडकर यांनी एन्कांटर करण्याची मागणी केली तर कराटे प्रशिक्षकाची पत्नी प्रीती ढाकणे आणि कराटे प्रशिक्षक प्रतिक ढाकणे यांनी आरोपीचे लिंग कापून टाकण्याची मागणी केली.