जालना – दि.13 ऑक्टोबर2024 चंदनझिरा पोलीस ठाणे हददीमध्ये एका 9 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांनी वेगवेगळे पथके तयार करुन अज्ञात आरोपी निष्पन्न करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने अज्ञात आरोपीताचा शोध घेत असतांना गुप्तबातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे इसम नामे आदित्य सुभाष जाधव, वय 19 वर्षे रा. मातोश्रीनगर, चंदनझिरा, जालना यास ताब्यात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी साहेब, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब यांचे मागदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक. पंकज जाधव. सपोनि.श्री.योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, संभाजी तनपुरे, प्रभाकर वाघ, दिपक घुगे, रमेश राठोड, जगदीश बावणे, सागर बाविस्कर, ईरशाद पटेल, देविदास भोजने, भागवत खरात सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांनी केली आहे.