जालना (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून परतुर विधानसभा मतदारसंघातील जालना तालुक्यातील नेर व सेवली या दोन्ही जिल्हा परिषद सर्कल मधील प्रधानमंत्री आवास योजनेतील 1765 लाभार्थ्यांच्या खात्यात 21 कोटी 18 लाख रुपये, रमाई आवास योजनेतील 1360 लाभार्थ्यांच्या खात्यात 16 कोटी 32 लाख रुपये, शबरी आवास योजनेतील 45 लाभार्थ्याच्या खात्यात 54 लाख रुपये, मोदी आवास योजनेतील 584 लाभार्थ्याच्या खात्यात सात कोटी 80 हजार रुपये,
अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील 23 लाभार्थ्याच्या खात्यात दोन लाख 76 हजार रुपये, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील पाच लाभार्थ्याच्या खात्यात सहा लाख रुपये, अशा नेर व सेवली सर्कल मधील 3782 ला घरकुल लाभार्थ्याच्या खात्यात 45 कोटी 38 लाख 40 हजार रुपये. जमा करण्यात आले असून याबरोबरच नेर व सेवली या दोन्ही जिल्हा परिषद सर्कल मधील 700 सिंचन विहिरी करता 30 कोटी 80 लाख रुपये, 450 जनावरांच्या गोठ्याकरता 3 कोटी 70 लाख आणि 250 शेतकऱ्यांना वृक्ष लागवड योजनेचा लाभ देण्यात आला आहे,
शाळेचे वॉल कंपाऊंड भूमिगत गटारी योजना स्मशानभूमी शेड बांधकामाचे प्रस्ताव घेणे चालू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या परतुर येथील संपर्क कार्यालयातून प्रसिद्ध देण्यात आलेल्या पत्रकार द्वारे दिली आहे.