जालना शहरातील मोतीबाग येथे नास्ता कॉर्नरवर बसलेल्या तरुणाला चाकुच्या मुठीने मारहाण करुन त्याच्या जवळचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केल्याची घटना दि. 14 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 7 ते 8 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकणी मारहाण झालेल्या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरुन चंदनझीरा पोलीस ठाण्यात मंगळवार दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या प्रकरणी सागर पंढरीनाथ शिंदे रा. रुपनगर, अंबड चौफुली जालना हा तरुण दि. 14 ऑक्टोबर 2024 रोजी मोतीबाग येथे नास्ता कॉर्नरवर बसला होता. दरम्यान तिथे अचानक अज्ञात 3 इसमानी संगणमत करुन चाकुच्या मुठीने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीला अस्वस्थ वाटू लागल्याने मारहाण करणार्या 3 जणांनी फिर्यादीच्या जवळचा मोबाईल हिसकावून नेला. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चंदनझीरा पोलीस ठाण्यात मारहाण करणार्या 3 जणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.