जालना शहरातील व्यापार्याला ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून खंडणी मागणार्या महिलेसह 5 जणांना सदरबाजार पोलीसांनी रंगेहात पकडले असून त्यांना मंगळवार दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान न्यायालयाने ब्लॅकमेल करणार्या महिलेसह 5 जणांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
एका व्यापार्याला गोड बोलून नंबर मिळविल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करुन करुन 2 लाखाची खंडणी मागण्यात आली होती.
संवादाचे व विडीओ कॉलचे काही व्हिडीओ तयार करुन ते विडिओ सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी दिली होती. सदरील विडीओ डिलीट करण्यासाठी 2 लाखांची खंडणी मागितली. दरम्यान पोलीसांना या घटनेची माहिती मिळल्याने त्यांनी जालना शहरातील भोकरन नाका परिसरात सापळा लावला आणि खंडणी घेणार्या आरोपींना रंगेहात पकडले. या प्रकरणात तक्रादार व्यापारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एका महिलेसह मंगेश बालाजी लहाने, गणेश कानीफ कुमठे, करण संजय कांबळे रा. तांदुळवाडी ता. जालना, अशोक शामराव इंगळे रा. सिंदखेड राजा यांच्याविरुद्ध सदर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पुढील तपास सदरबाजार पोलीस करीत आहेत.