जालना – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या आरोपीला 3 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल दि. 23 ऑक्टोबर 2024 रोजी दिला असल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील भारत खांडेकर यांनी गुरुवार दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता दिली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहीते यांनी हा निकाल दिलाय.
आरोपी सुदाम कोंडीबा गोफणे रा. टेंभुर्णी ता. जाफाबाद जि. जालना असं शिक्षा सुनावलेल्या आरोपीचं नाव आहे. सदरील आरोपीला कलम 08 लैंगीक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधीनियम-2012 नुसार 3 वर्ष सक्तमजुरी व 3 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने साध्या कारावसाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकिल भारत के. खांडेकर यांनी काम पाहिले.
दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता पिडीत मुलगी ही घराच्या पाठीमागे असलेल्या लिंबूच्या झाडाची लिंबु तोडत असतांना आरोपी सुदाम कोंडीबा गोफणे हा शेळया चारण्याचे बहाण्याने पीडीतेजवळ गेला. ती एकटी असल्याचा फायदा घेवून तिला कोपर्यात ओढून तिचा विनयभंग करुन लैंगीक सतवणूक केली. आरोपीच्या वर्तणामुळे पिडीत मुलगी ओरडली प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आरेफ शहा हे तिथे आल्याने आरोपी तेथून पळूण गेला. सदरील घटना घरी सांगीतल्याने त्याच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कलम 354 (अ), 354 (ड) भा.द.वी सह कलम 8, 12 पोक्सो कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करुन मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. त्यावर सरकार पक्षाच्या वतीने एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये, पिडीत मुलगी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ पंच, व तपासीक अधिकारी सहा. पोलीस अधिक्षक एस.व्ही. खामगळ यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.