जालना शहरातून एका वर्षासाठी हद्दपार केलेल्या दोन जणावर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई गुरुवार दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 7 आणि 8 वाजता दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली.
हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक कार्यालय जालना यांनी दि. 24 मे 2024 रोजी काढलेल्या आदेशानुसार सचिन कैलास गायकवाड आणि सुरज कैलास गायकवाड यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. परंतु, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन ते जालना शहरातील चंदनझीरा भागात लहुजीनगर येथे फिरत असल्याची माहिती चंदनझीरा पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जावून सुरज कैलास गायकवाड याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर पुन्हा दुसरी कारवाई करुन सचिन कैलास गायकवाड याला ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यावर आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपुत, पोलीस उप निरीक्षक सचिन सानप, पो. ना. राजु पवार, पो. काँ. सागर खैरे यांनी केली.