जालना शहरातील जमुना नगर भागात अज्ञात समाज कंटकाकडून सुतळी बॉम्ब फोडून दुचाकी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय परिसरात दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 3 ते 5 वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील जमुना नगर, सर्वे क्र. 443 मध्ये पत्रकार कैलास गंगाधरराव फुलारी हे राहत असलेल्या निवासस्थानी पहाटे 3 ते 5 वाजेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटक, चोर, दरोडेखोर यांनी सुतळी बॉब लावून दुचाकी वाहन जाळण्याचा प्रयत्न केल्याचं पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. या घटनेत काहीही आर्थिक नुकसान झाले नसले तरी परिसरात दहशतीचे व भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी तात्काळ चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी पोलीस अधिक्षक आणि कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली. या तक्रारीवर पत्रकार कैलास गंगाधरराव फुलारी, मच्छीन्द्र कुसमोडे, जानराव सातोटे, अशोक फकीरराव बावणे, रवींद्र कुलथरके , आनंद कुंडलिकर, रवींद्र कमाने, देवानंद खेबाळे, विशाल हिरे, संजय देशपांडे यांच्यासह इतरांची नावे आहेत.