जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत एच आई व्ही एड्स अॅक्ट 2017 या कायद्या अंतर्गत एच आई व्ही रुग्णाच्या हितासाठी, भेदभाव टाळण्यासाठी व त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता तक्रार निवारण अधिकारी कार्यशाळा घेण्यात आली.
प्रत्येक ग्रामीण रुग्णालय मध्ये तक्रार निवारण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या तक्रार अधिकार्यांची आज कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कायद्याविषयी माहिती देण्यात आली. तालुका स्तरावर या रुग्णाची बैठक घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी केले. यावेळी डॉ. मनीष सहानी यांनी कायद्या विषयी व रुग्णच्या हक्काविषयी माहिती दिली. प्राजक्ता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेस डॉ. वैजिनाथ राठोड, डॉ. गणेश राठोड, डॉ. राजू राठोड, डॉ. तौर, डॉ. वाघ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिीती होती.